उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव जिल्हा दौऱ्यावर
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे २ फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येतं आहेत.
अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनासाठी २ फेब्रुवारीला येत आहेत. या कार्यक्रमानंतर ते चोपडा येथे घन:श्याम अग्रवाल यांनी शंभर कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या शिवकृपा कॉटस्पीन या सूतगिरणीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे परिसरातील चारशे लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.तसेच यावल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा मेळावाही होणार असल्याने तेथे ते उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली.