मोफत मधुमेह (डायबिटीस) व रक्तदाब (B.P) तपासणी शिबिर संपन्न
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा l जळगाव येथे मोफत मधुमेह (डायबिटीस) व रक्तदाब (B.P) तपासणी शिबिर व शिवालय स्पाईन & न्युरो तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले. दि. २१ , २२ , २३ डिसेंबर २०२२ तिन दिवसीय सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा. रविंद्र नांदेडकर प्रणित मधुमेह मुक्त भारत अभियाना अंतर्गत तथा शिवालय स्पाईन & न्यूरो याच्या संयुक्त विद्यमानाने जळगांव शहरात हरी विठ्ठल नगर येथे मोफत मधुमेह आणि रक्तदाब तपासणी शिबिर . सकाळी ९:३० ते ०३:३० ह्या वेळेत संपन्न झाले. या शिबीराचा स्थानिक नागरिकांनी लाभ घेतला.
या वेळी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान तर्फे • दुर्गेश निंबाळकर जळगांव यांनी उचीत आहार उचीत उपचाराने मधुमेह कश्या प्रकारे कमी होऊ शकतो. या बद्दल मार्गदर्शन केले. जळगाव शहरातील या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. श्री. दुर्गेश निंबाळकर जळगांव ( स्वास्थ्य प्रचारक- 9405137716) यांनी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान समन्वयक म्हणून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते.