जळगाव लोकसभेचा उमेदवार बदलण्याच्या चर्चांना वेग, कारण पवार यांच्या उमेदवारीने भाजप समोर तगडं आव्हान?
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भाजपने जळगाव लोकसभा मतदार संघात खासदार उन्मेष पाटील यांना डावलून लोकसभेची उमेदवारी माजी आमदार स्मिता वाघ यांना दिल्याने उन्मेष पाटील हे नाराज होऊन त्यांनी लोकसभेचा राजीनामा देत ठाकरे शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश केला व सहकारी कारण पवार यांना शिवसेनेने जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी सुद्धा जाहीर केली.
शिवसेना ठाकरे गटातर्फे करण पवार यांना देण्यात आलेली उमेदवारी आता भाजपाला डोकेदुखी ठरली असल्याची खात्रीशीर माहिती मिळत असून भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात विरोधी पक्षाला तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने आता भाजप कोंडीत सापडला आहे. उन्मेष पाटील त्यांचं सहकार्य असल्याने कारण पवार यांचं भाजप समोर तगडं आव्हान मानलं जातं. त्यामुळे पुन्हा उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या च्या चर्चांना उधाण आले आहे. याचं पाश्र्वभूमीवर संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन हे सक्रिय झाल्याचेही समजते.
गेल्या पंचवार्षिकमध्ये हुशार व कामात कुशल असलेले खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले,व खा. उन्मेष पाटील यांनाहि अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. आणि त्या भावनेतून अखेर त्यांनी खासदारकीचा राजीनामा ही दिला. व शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला,सर्वांची अशी भावना होती की, उन्मेष पाटील हे स्वतः लोकसभेचे उमेदवार राहतील, परंतु तसे न करता त्यांनी आपले समर्थक पारोळा येथील युवा करण पवार यांना पुढे करून त्यांना उमेदवार म्हणून पुढे करत मास्टर स्ट्रोक मारला,व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कारण पवार यांची उमेदवारी जाहीर केली
स्मिता वाघ यांच्याविरुद्ध तुल्यबळ उमेदवार शिवसेना ठाकरे गटाला मिळणार नाही या भ्रमात असणारी भाजपाची खेळी उन्मेष पाटील यांच्या या खेळीमुळे उलटली त्या मुळे भाजप अडचणीत आली,करण पवार, उन्मेष पाटील यांचेसह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने जळगावची ही जागा भाजपच्या हातून जाते की काय असा प्रश्न निर्माण झाला. आणि त्या मुळेच की काय , संकटमोचक गिरीश महाजन हे कामाला लागले असून पुन्हा एकदा उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या.यात माजी खासदार ए. टी. नाना पाटील, आ.मंगेश चव्हाण यांच्या नावाच्या चर्चाही सुरु झाल्या. परंतु भाजप दिलेला उमेदवार बदलणार का? परंतु सर्वात मोठी बाब म्हणजे जळगाव लोकसभा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, व भाजपा आपला उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणू शकतो असे नेत्यांकडून सांगितले गेले. व भाजपा आपला दिलेला उमेदवार बदलणार नाही व दिलेला उमेदवार निवडून आणणारच असेही भाजपा कडून सांगण्यात आलं.