जिल्ह्यातील शासकीय व गायरान जमिनी वरील अतिक्रमण काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यभरात गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे,हे अतिक्रमण झालेले काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत,त्या आदेशाचे पालन करत सम्पूर्ण जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका निहाय शासकीय व गायरान जमिनीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http://www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर तसेच तहसील कार्यालय पंचायत, समिती नगरपरिषद व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदरहू शासकीय तसेच गायरान जमिनीवर कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रयोजनासाठी विनापरवानगीने वापरात आणून त्यावर अतिक्रमण केले असेल अशा सर्व व्यक्तींनी सदरचे अतिक्रमणे स्वतःहून 24 तासात काढून घ्यावे व शासनास सहकार्य करावे. अतिक्रमणधारकाने स्वतःहून अतिक्रमान न काढल्यास उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्र. ०२/२०२२ मधील दिनांक १५ सप्टेंबर व ६ ऑक्टोबरच्या आदेशानुसार प्रशासनातर्फे अतिक्रमण निष्कासनाचे कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कळविले आहे.