जिल्ह्यात ८४९ कोरोना बाधित; मुक्ताईनगर, भुसावळात पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कायम असून जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८४९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ८४७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव शहारात बाधितांचा आकडा चिंता वाढवणारा आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी– जळगाव शहर- ८६, जळगाव ग्रामीण-२२, भुसावळ- १६३, अमळनेर-२६, चोपडा-४२, पाचोरा-१५, भडगाव-०८, धरणगाव-१५, यावल-२५, एरंडोल-२२, जामनेर-६१, रावेर-५२, पारोळा-१६, चाळीसगाव-४८, मुक्ताईनगर-१७१, बोदवड-५१, इतर जिल्ह्यातील-२६ असे एकुण ८४९ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३२ हजार ४२३ पर्यंत पोहचली असून १२० हजार १५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २३७४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९९९४ रुग्ण सध्या उपचार घेताय.