जिल्हा दुध संघ निवडणूक : रावेर मतदार संघातुन ठाकसेन पाटील याची उमेदवारी कायम
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। जिल्हा दुध संघात रावेर तालुक्यातून निवडणूकित उमेदवारी अर्ज दाखल केलेले ठकसेन पाटील याचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला होता,त्यावर आव्हान देत ठाकसेन पाटील यांनी अपील केले होते, ठकसेन पाटील यांच्या निवडणुकीचा अर्ज नाशिक येथील सहकार आयुक्त (दुग्ध) यांनी वैध ठरविल्या ने जगदीश बढे यांनी याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी बढे यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने पाटील यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ठकसेन पाटील यांचा अवैध ठरविलेला उमेदवारी अर्ज नाशिक येथील सहकार आयुक्त (दुग्ध) यांनी वैध ठरविल्यानंतर जगदीश बढे यांनी याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होऊन जगदीश बढे यांचा दावा फेटाळून लावत ठकसेन पाटील यांना निवडणूक लढविता येणार असल्याचा निकाल दिला.त्या मुळे आता जिल्हा दूध संघाच्या रावेर मतदार संघातून जगदीश बढे विरुद्ध ठाकसेन पाटील असा सामना होणार.दरम्यान ,राज्य शासनाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाला २० डिसेंबर पर्यंत स्थगिती दिली असल्याने जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक सध्या स्थगित झालेली आहे.