अखेरच्या क्षणी नाट्यमय कलाटणी ! जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जेडीसीसी बँक अर्थात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट पहायला मिळाला.जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीही आयत्यावेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यानंतर गुप्त पद्धतीनं मतदान झालं. यामध्ये संजय पवार यांनाव ११ तर रविंद्रभैय्या पाटील यांना १० मते पडली. संजय पवार विजयी झाले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती जिल्हा बँकेत पुढील एक वर्षांसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होतं. त्यानुसार रविंद्र भैय्या पाटील यांनी अर्ज दाखल केला.
मात्र, यानंतर नाट्यमय घडामोडी घडत अध्यक्षपदासाठी बंडखोरीची चर्चा सुरु झाली. रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित झाल्यांनंतरही अजून दोन अर्ज दाखल झाले होते. आयत्या वेळी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी संजय पवार यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.
या निवडणुकीची सूत्र आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे होती. त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय पद्धतीने खेळी खेळत संजय पवार यांना विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली.
मतदान होवून संजय पवार विजयी झाले. त्यांना सुचक म्हणून शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील तर अनुमोदक म्हणून जिल्हा बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांनी अनुमोदन दिलं होतं. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.