जळगाव जिल्ह्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती लागू होणार आहेत. अशी माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली ती अशी…
जळगाव तालुक्यातील जळगाव, भोकर, म्हसावाद, नशिराबाद, असोदा, पिंप्राळा महसूली मंडळामध्ये,
तालुका जामनेर महसूली मंडळामध्ये जामनेर, पहुर, शेंदुर्णी, वाकडी, मालदाभाडी, नेरी, तोंडापूर महसूली मंडळामध्ये, तालुका एंरडोल मध्ये एरंडोल, उमरदे (रिंगणगाव), कासोदा, उत्राण महसूली मंडळामध्ये, तालुका धरणगाव मध्ये धरणगाव, सोनवंद, पाळधी, पिंपरी खुर्द, साळवा, नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये, चांदसर तालुका भुसावळमध्ये भुसावळ, वरणगाव, कु-हे प्र.नृ, पिंपळगाव महसूली मंडळामध्ये, तालुका बोदवड मध्ये बोधवड, करंजी नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये, तालुका यावल मधील भालोद, किनगाव, साकळी, फैजपूर, बामणूद महसूली मंडळामध्ये, तालुका रावेळ मधील खिरडी, निभोंरा बुद्रुक महसूली मंडळामध्ये, तालुका मुक्ताईनगर मधील मुक्ताईनगर, अंतुर्ली, घोडसगाव महसूली मंडळामध्ये, तालुका पाचोरा मधील पाचोरा, नगरदेवळा, गाळण, पिंपळगाव हरेश्वर, कु-हाड, वरखेड बुद्रूक महसूली मंडळामध्ये, तालुका भडगांव मधील भडगांव, कांजगाव (गोंडगाव), आमडदे, कोळगाव महसूली मंडळामध्ये, तालुका अमळनेर मधील अमळनेर, पातोंडा, भरवस, मारवड, अंमळगाव, शिरूड, वावडे महसूली मंडळामध्ये, तालुका चोपाडा मधील चोपडा, आडावत, गोरगावल बु, चाहाडा, धानोरा प्र.य., लासुर महसूली मंडळामध्ये, तालुका पारोळा मध्ये बहादरपुर, घोरवड, शेवाळे बुद्रुक महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून आगामी कालावधीतही दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेवून उर्वरीत भागासाठी निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.