पाण्याची पातळी वाढल्याने हतनूर धरणांमधून पाणीप्रवाह सोडणार- प्रशासनाच “हे” आवाहन
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पूर्णा नदीची पातळी वाढण्यात सुरुवात झाल्याने आज तापी नदी पात्रात हतनूर धरणांमधून पुढच्या काही वेळात पाणी प्रवाह सोडण्यात येणार असून हतनूर धरणाचे खालील गावांनी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आज दिनांक १७ जून २०२२ रोजी पुर्णा नदीची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली असून हतनूर धरणातून पुढील काही तासांमध्ये तापी नदी पात्रात हतनूर धरणांमधून पाणी प्रवाह सोडण्यात येणार असून हतनूर धरणाचे खालील गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये याकरिता प्रत्येक गावात दवंडी द्वारे सूचना देणे आवश्यक आहे हे आपले माहितीसाठी व कार्यवाहीसाठी सविनय सादर करण्यात येत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी कळविले आहे.