भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

एरंडोलक्राईमजळगाव

क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

जळगाव ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात खुनाची एक धक्कदायक घटना समोर आली. क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून करून संपविले.

या संदर्भात पोलिसांनी केलेल्या चौकशीत भगवान महाजन याने घटनाक्रम सांगितला. यानुसार भगवान महाजन आणि सत्यवान महाजन हे दोन्ही भाऊ एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रहिवासी होते. दोन्ही एकाच घरात राहत असून त्यांच्यात अनेकदा कुरबुरी होत असत. सत्यवान महाजन यांनी घरातील मोरीत लघुशंका केल्यावरून वाद झाला. यातून संतापलेल्या भगवान याने डोक्यात मुसळी हाणल्याने सत्यवान महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. भगवानने मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला. यानंतर रात्री उशीरा त्याने पोत्यातून मृतदेह नेउन तो गिरणा नदीच्या पात्रात फेकून दिला.

एरंडोल तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथे ही घटना घडली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भातखंडेच्याजवळ गिरणा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. हा व्यक्ती तालुक्यातील उत्राण येथील सत्यवान धोंडू महाजन यांचा असल्याची ओळख पटली. पोलीस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली सत्यवान महाजन यांना त्यांचाच मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन याने त्याचा खून त्याला संपविल्याची माहिती उघड झाली. या संदर्भात भगवान धोंडू महाजन याला पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!