नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात, खडसेंचा विरोधकांवर निशाणा
जळगाव, मंडे टू मंडे न्युज, वृत्तसेवा। भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशीचे आदेश काढण्यात आले आहे. या प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर निशाणा साधला आहे.भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसें यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
आतापर्यंत चार ते पाच प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न सुदैवाने न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिल्यामुळे आज मी बाहेर आहे. पण भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला असून नाथाभाऊंना गुन्ह्यांमध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात असा निशानाही एकनाथ खडसेंनी विरोधकांवर साधला आहे.
या बाबत अँटी करप्शनकडून पूर्णपणे चौकशी होऊन याचा क्लोजर रिपोर्ट दोन वर्षांपूर्वी न्यायालयात सादर करण्यात आला. आता मात्र राज्य सरकारने आपल्याच तपासणी अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत पुन्हा चौकशी अहवाल सादर केला असून यामध्ये कुठलेही तथ्य नसून आपण यात निर्दोष असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.