भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमुक्ताईनगर

राजकीय वर्तुळात खळबळ…! माजी मंत्री एकनाथ खडसेंसह कुटुंबियांना अवैध उत्खनन प्रकरणी १३७ कोटींची नोटीस

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड या शिवारातील भूखंडामधून एका टेकडीवरून अवैध उत्खनन केल्या प्रकरणी माजी मंत्री,आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांचे कुटुंबिय हे अडचणीत सापडले आहेत .
याबाबत तहसीलदारांनी दंडाची नोटीस देखील बजावलेली आहे .दरम्यान यामुळे राजकीय व इतर क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


या बाबत अधिक माहिती अशी कि ,माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची मालकी असलेली सातोड शिवारा लगत एका जमिनीतून मोठ्या टेकडी मधून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे अवैध्य उत्खनन करण्यात आल्याचा आरोप मुक्ताईनगचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या बाबत त्यांनी विधानसभेत देखील प्रश्‍न उपस्थित केला होता . या अवैध्य मुरमाच्या उत्खनन प्रकरणी तब्बल चारशे कोटी रूपयांच्या गौणखनिजाचे उत्खनन केले असल्याचे त्यांनीसांगितले होते . हा सर्व मुरूम हा महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एसआयटी नेमण्याची घोषणा देखील केली होती. या संपूर्ण प्रकारांची एसआयटीने चौकशी करून प्रत्यक्ष उत्खनन किती केले ? याचे मोजमाप देखील करण्यात आले होते .


एसआयटीने केलेल्या चौकशी नंतर आलेल्या रिपोर्टच्या माध्यमातून मुक्ताईनगरच्या तहसीलदारांनी खडसे कुटुंबियांना नोटीस बजावली आहे . त्यानुसार अवैधरित्या उत्खनन केलेल्या गौण खनिजासाजही किंमत ही २६ कोटी एक लाख १२ हजार ११७ इतकी दाखविण्यात आलेली आहे. नियमानुसार याच्या पाचपट दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयाचा दंड आकारण्याबाबत ही नोटीस बजावन्यात आली आहे.


या प्रकरणात आमदार एकनाथ खडसे यांच्यबरोबर खासदार रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे व रोहिणी खडसे, यांच्यासह इतर जमीन मालकांना देखील नोटीस बजाविण्यात आली आहे . मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी ही नोटीस बजावली आहे. या नोटीसीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे . या प्रकरणात पुढे काय होते याबाबाबत सर्वांना उत्सुकता लागलेली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!