भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। अवकाळीचा तडाक्यानंतर आता जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढू लागला आहे. त्यात पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असून हाेळीपर्यंत तापमान तब्बल ४४ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कमाल तापमानात सतत वाढ हाेत आहे. शनिवारी ३७.१ अंश तापमान नाेंदविले गेले.

त्यात आणखी साेमवार पासून वाढ हाेण्याची शक्यता असून येत्या शुक्रवारपर्यंत पारा चाळीशी पार करून तब्बल ४४ अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आठवडाभर जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट असणार आहे. आठवड्यानंतर दाेन अंशानी तापमान कमी हाेवून ४० ते ४२ अंशादरम्यान असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात गहू, हरभरा, बाजरी, सूर्यफूल, मका या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. आता आकाश निरभ्र आणि तापमान वाढणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!