जळगाव मध्ये पिता-पुत्राची विष घेऊन आत्महत्या !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। येथील आदर्शनगर भागातील रहिवासी पिता-पुत्राने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, दीपक रतीलाल सोनार (वय ६३) हे आपल्या कुटुंबासह आदर्श नगरात वास्तव्यास आहेत. गत दोन दिवसांपासून त्यांची पत्नी कोरोना बाधीत झाल्यामुळे त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीपक सोनार यांची मुलगी व जावई त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी उपचार सुरू असणाऱ्या आईची विचारपूस केली. यानंतर सायंकाळी मुलगी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आली असता दीपक रतीलाल सोनार (वय ६२) व त्यांचा मुलगा परेश दीपक सोनार (वय ३४) यांचे मृतदेह त्यांना आढळून आल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात आणले असता विष प्राशन केल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.