तरुणाचा रस्ता आडवित फायटरने मारहाण : दोघांवर गुन्हा दाखल !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील एका परिसरात २४ वर्षीय तरुणाचा रस्ता आडवित फायटरने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी दोन जणांविरोधात शनीपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील शंकरराव नगरातील महेश उर्फ मुकेश राजू निंबाळकर (वय-२४) हा मजूरी राहतो. शुक्रवारी १ एप्रिल रोजी रात्री तो चौघुले प्लॉट परिसरात राहत असलेल्या त्याच्या आत्याकडे जेवणासाठी जात असतांना त्याचवेळी हनुमान मंदिराच्या चौकात राकेश साळुंखे उर्फ लिंबू राक्या व गोलू परदेशी (पुर्ण नाव माहित नाही) हे दोघ भेटले. “सध्या तु खुप हवेत उडत आहे” असे म्हणत ते महेशला शिवीगाळ करण्यात सुरवात केली.
त्या दोघांना महेश समजविण्यासाठी गेला असता, गोलू परदेशी याने महेशला पकडून ठेवले तर राकेश याने त्याच्या हातातील फायटरने चेहऱ्यावर व कपाळावर मारुन दुखापत करीत गंभीर जखमी केले. या प्रकरणी महेश निंबाळकर याने दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसात राकेश साळुंखे उर्फ लिंबू राक्या, गोलू परदेशी या दोघांविरुद्ध नोंदविण्यात आला आहे.