भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

अखेर एलसीबीचे पो.निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर गुन्हा दाखल

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे एलसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध जळगावच्या जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात विनोद पंजाबराव देशमुख ,वय 49 वर्ष, व्यवसाय बांधकाम व्यावसायिक, रा. 12 मधुवन, महाराष्ट्र बँक कॉलनी, महाबळ रिक्षा स्टॉप जवळ, जळगाव. यांनी फिर्याद दिली आहे. श्री. देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव जिल्हा पोलीस दलास व दलातील ब-याचशा पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना ओळखतो. त्यापैकी किरण कुमार बकाले पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना व्यक्तीश: ओळखतो. त्यांची व माझी लहान मोठया कार्यक्रमात भेट झाली आहे. तसेच स.फौजदार अशोक ओंकार महाजन नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना सुध्दा ओळखतो ते स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथे हजेरी मेजर म्हणुन कर्तव्य पार पाडीत आहे. दरम्यान, एका व्हाटसअप ग्रुपवर 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठिक 4 वाजता ग्रुपवर आलेली ऑडीओ क्लीप मी डाऊनलोड केली. ती 3.13 मिनीटांची असून ती क्लिप मी ऐकली असता, त्यामध्ये एक जबाबदार शासकीय नोकर असलेले किरणकुमार बकाले हे त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सफौ. अशोक महाजन यांच्याशी कामानिमीत्त चर्चा करत असतांना मराठा समाजाबददल आक्षेपार्ह, घृणास्पद व स्त्रियांना लाज वाटेल असे बोलून मराठा समाजातील सर्व स्त्री पुरुष व लहान थोरांचा अपमान करून जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे. बकाले हे सरकारी नोकर व जबाबदार पदावर असतांना आपल्या सहकारी अंमलदारांशी फोनवर बोलतांना ‘मराठा समाजाबददल’ अतिशय घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजामध्ये द्वेष भावना वाढवण्याचा प्रयत्न केला व असे वक्तव्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झालेला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आधी एलसीबीतून उचलबांगडी त्यानंतर निलंबन आणि आता गुन्हा दाखल झाल्यामुळे किरणकुमार बकाले हे अडचणीत आले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!