क्राईमजळगावराजकीय

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

जळगाव, प्रतिनिधी: जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री अज्ञातांनी गोळीबार केला असून पोलीस गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत असून यामुळे परिसरासह राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चिले जाणारे जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री अज्ञातांकडून गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात ते सुदैवाने बचावले आहे. अज्ञातांनी चारचाकीतून येऊन हा गोळीबार केला असून, पोलीस सध्या गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. रामानंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असून, महापौर पाटील यांच्या घराजवळ जमाव जमला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!