भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

आधी नाव बदलून मैत्री, नंतर सेल्फी काढून ब्लॅकमेल करत विद्यार्थिनीवर अत्याचार

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला. या तरुणांनी नाव बदलून विद्यार्थिनीशी मैत्री केली. यानंतर तिच्यासोबत सेल्फी काढून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी विद्यार्थिनीवर अत्याचार करतानाचेही फोटो काढले. यानंतर ते सातत्याने तिला ब्लॅकमेल करत असल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील विद्यार्थिनी सोबत घडल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

विद्यार्थिनी सोबत गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे या सगळ्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने या तरुणांविरोधात जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील साक्री येथील इम्रान शब्बीर मन्यार आणि परभणी येथील इकबाल खान या दोन संशयितांना अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या तरुणांकडून ४ मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमध्ये अन्य काही मुलींचेही आक्षेपार्ह फोटो आढळून आले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून या तरुणींवर देखील अशाच प्रकारे अत्याचार करून ब्लॅकमेल केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रामानंद नगर पोलिसस्टेशनचे पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!