भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात किरोनाचा पहिला रुग्ण,संपर्कातील १४ जणांची केली कोव्हीड तपासणी

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेदुखी वाढवली असून पुन्हा एकदा राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यावेळी कोरोनाचा JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. दिवसेंदिवस या व्हेरीएंटचे रुग्ण वाढतांना दिसत असल्याने आरोग्य यंत्रनेचे टेन्शन वाढवलं आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून सर्वच आरोग्य यंत्रणांना अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रात या व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला ४३ वर्षीय रुग्ण आढळून आला आहे.सदर रुग्ण भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील असून काही दिवसापूर्वी तो नेपाळ वरून आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान त्याच्या संपर्कातील १४ जणांची कोव्हीड तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून या रुग्णाला ताप, कफ आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांच्या उपचार सुरू होते.

भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील ४३ वर्षीय रुग्नाची प्रकृती उत्तम आहे. एचआरसिटी रिपोर्ट २४ आहे, म्हणजेचं चिंतेच कारण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.तरी राज्यातील परिस्थिती पाहता व मुख्यमंत्री यांनी काही दिवसापूर्वीच प्रशासनाला दिलेल्या सूचना यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट आहे.सध्या तरी जळगाव जिल्ह्यात या नव्या JN1 जेएन–वन नवीन व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडलेला नसला तरी काळजी घेण्याचेआवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!