घरकुल घोटाळ्यातील चार नगरसेवक अपात्र
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। संपूर्ण राज्यभर गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्यात चार वर्षांपूर्वी धुळे न्यायालयाने निकाल दिला होता.जळगाव महानगरपालिकेत विद्यमान असलेले नगरसेवक लता रणजीत भोईटे, कैलास सोनवणे, भगत बालाणी, सदाशिवराव ढेकळे, दत्तात्रय कोळी हे पाच अपात्र ठरले. या निकालात संशयित आरोपींना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावल्यावर देखील नगरसेवकपदी कायम राहिल्याने विरोधी पक्षाचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर आज गुरूवार १३ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत जळगाव महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक लता रणजीत भोईटे, कैलास सोनवणे, भगत बालाणी, सदाशिवराव ढेकळे, हे ४ नगरसेवक अपात्र ठरविले आहे. दत्तात्रय कोळी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली असल्यामुळे त्यांच्याविषयी काही आदेश झालेले नाही.जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे महापालिकेसह राजकीय वर्तूळात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव येथील दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायमूर्ती सय्यद यांनी अपात्रतेसंदर्भात निकाल दिला. अपात्र नगरसेवकांच्या वतीने अँड. प्रदीप कुलकर्णी तर याचिकाकर्ते प्रशांत नाईक यांच्यावतीने अँड. सुधीर कुलकर्णी यांनी काम पाहिले तर अपात्र नगरसेवकांच्या वतीने अँड. प्रदीप कुलकर्णी यांनी काम पाहिले.