गिरीश महाजन यांचं राष्ट्रवादी कांग्रेस बाबत मोठं भाकीत! काय म्हणाले महाजन?
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रवादीमधून अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांनी गेल्या रविवारी भाजप, शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होत आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले महाजन?
उद्धव ठाकरेंना ज्याप्रमाणे चिन्हापासून सुरुवात करावी लागली, त्याचप्रमाणे शरद पवारांना आता नव्याने पक्ष उभारणी करावी लागेल. नव्याने संघटना उभी करावी लागेल. त्यासाठी ते प्रयत्न करतायेत हे चांगलं आहे. त्यांच्या पक्षाचा, चिन्हाचा निर्णय अजून आलेला नाही. पण बहुसंख्य आमदार आज अजित पवारांकडे आहेत. शरद पवारांकडे फक्त आठ-दहा आमदार शिल्लक आहेत. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं, कार्यालय कुणाचं? अशी लढाई आता सुरू होईल. जे शिवसेनेत झालं तेच आता राष्ट्रवादीत होईल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.