जिल्हा सामान्य रुग्णालयात तरुणीचा विनयभंग
जळगाव,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात विजय दिलीप पाटील या संशयित आरोपीने एका तरुणीचा लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी विजय पाटील सह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एक २२ वर्षीय तरुणी दि. २७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात असता ‘ तू माझ्यासोबत चल, नाही तर, तूला उचलून नेईल ‘ एवढेच नव्हे तर हात ओढून तरुणीला लज्जा उत्त्पन्न होईल, असे कृत्य संशयित आरोपी विजय दिलीप पाटील याने केले. या प्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विजय पाटील सह दोन तरुणांवर जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.