जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्या संदर्भात महत्वपूर्ण संकेत, काय म्हणाले पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पावसाच्या पाण्या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती दिली .राज्यात अनेक भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असून अनेक पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
या पाश्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पावसाबाबतचा शास्रज्ञांशी चर्चा सुरु असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, कृत्रिम पाऊस पडताना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये, म्हणून पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबतचा शासनाच्या चर्चेतील निर्णय घेतला जाईल, अशी ही माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.
काही गावांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरही परिस्थिती लक्षात घेता विहिरी अधिकृत करण्यासह विविध उपाययोजना सुद्धा करण्यात येत आहे. ‘पाऊस पडावा, यासाठी आपण देवाला प्रार्थना करु.. तसेच गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी मी स्वतः कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कृत्रिम पाऊस पडण्याबाबत प्रश्न मांडला आहे. कृत्रिम पाऊस पडताना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये, म्हणून पोषक वातावरण नसल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबतचा शासनाच्या चर्चेतील निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.