गुटखा प्रकरण भोवले, पोलिस उपनिरीक्षका सह पोहेकॉ निलंबित
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अवैध गुटख्याची वाहतूक करणारे वाहन सोमवार १६ ऑक्टोबर रोजी रात्री पकडले होते त्या गुटख्याच्या वाहनावर कारवाई न करता ते सोडून दिल्याप्रकरणी पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ किरण शिंपी यांना अखेर १८ ऑक्टोबर बुधवार रोजी निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले.
पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे याना पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून ते वाहन पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ अमोल शिंपी यांनी सोमवार १६ ऑक्टोबर रोजी रात्री पकडले असता या गुटख्याच्या वाहनावर कारवाई न करता ते साडून देण्यात आले. या विषयीचा अहवाल पहूर पोलिस ठाण्याकडून पोलिस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्यात आला होता. त्यावर मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी कार्यालयीन कारवाई सुरु करण्यात आली होती. त्यात गर्जे व शिंपी या दोघांनाही निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता काढले. या प्रकरणाची उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे चौकशी देण्यात आली आहे.