भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावसामाजिक

“होळी रे होळी पुरणाची पोळी” दुष्ट प्रवृत्तींचा नाश होवो, होळीच्या “या” द्या खास शुभेच्छा!

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। होळीचा सण हा एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. आज होळीचा सण महाराष्ट्रासह काही राज्यात साजरा केला जाणार आहे. होळीचा सण हा सर्वासामान्य लोकांबरोबरच अगदी सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आनंदाने साजरा करतात.

आज होलिका दहन आहे, दुष्ट प्रवृत्तींचा नाश होवो आणि चांगल्या प्रवृत्ती वाढीस लागो अशा शुभेच्छा आज आपण आपल्या प्रियजनांना देणार आहोत. होळी म्हणजे खोट्या प्रवृत्तीवर खऱ्याचा विजय किंवा असत्यावर सत्याचा विजय अशा अर्थाने पाहिली जाते.

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नाश होवो ! होळीच्या हार्दिक शुभेच्छा

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीचे सामाजिक महत्त्व म्हटले जाते. या सणाच्या दिवशी लोक त्यांच्यातील मतभेद विसरून एकत्र येतात.

असे मानले जाते की या दिवशी लोकांमधील आपापसातील सर्व प्रकारचे मतभेद दूर होतात. कारण होळीसोबतच विविध प्रकारचे रंग हे प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. या सणानिमित्त लोकांमधील परस्पर प्रेम आणि आपुलकी वाढते. तर, धार्मिक महत्त्वाबद्दल असं सांगण्यात येत की, या दिवशी होलिका सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश करते आणि सकारात्मकतेची सुरुवात होते.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून लाकडं मंत्रोच्चारात जाळतात येतात, या दहनावेळी नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि खोबरं यात दहन केलं जातं. पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात.

महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. काही ठिकाणी “होळी रे होळी पुरणाची पोळी” असं देखील म्हटलं जातं. नैवेद्य म्हणून टाकलेलं खोबरं प्रसाद म्हणून खाल्ला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो.

होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला ‘धुळवड’ असेही म्हणतात. या दिवशी होळीची राख अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. या दिवशी एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.

शेतकरी वर्गात होळीचे खास महत्त्व
भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.आपणा सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!