भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

मीही मंत्रीपदाचा विचार केला नाही.. मंत्रीपदाचा सट्टा लावूनच… गुलाबराव पाटलांनी स्पष्टच सांगितलं

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नेहमीच बोलण्यात प्रसिद्ध असणारे गुलाबराव पाटील यांनी पुन्हा ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. मागच्या अडिच वर्षात उद्धव ठाकरेंमुळे विकास झाला नसल्याचे खापर गुलाबराव पाटील यांनी फोडले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मागच्या नऊ महिन्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार टीका होताना दिसून येत आहे.

मंत्रीपदाचा सट्टा लावून आम्ही तो निर्णय घेतला होता कदाचित हा सत्तेचा प्रयोग फसला असता तर? मात्र तरीदेखील मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटलांनी सांगितलं. नागपूरपासून ते दादरपर्यंत सर्व गेले. त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदारसंघात विकास करू शकलो नसतो, असंही त्यांनी सांगितलं

उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये जलद गतीने कामे करू शकलो नाही. मात्र आता मूळ कामे सुरू झाली असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री सात महिन्यात पाच वेळा जळगाव जिल्ह्यात येणारी एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात सगळेच लॉकडाऊन व स्वतः उद्धव ठाकरे लॉकडाऊन होते. अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

कामाला उत्तर द्या व कामानेच बोला शेतकऱ्यांना व जनतेला काम हवय बोलबच्चन अमिताभ बच्चन नको त्यामुळे खोके बोलून विकास होत नाही. तर खोक्यांचा विकास झाला पाहिजे, खोके देऊन लोकांची काम केल्या गेली पाहिजे. ते काम मी करत असल्याचे म्हणत विरोधकांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे

आपल्यातला एक मराठा चेहरा आपल्यापासून लांब जात असून तो जाता कामा नये हे उद्धव ठाकरेंना आधी समजावलं होतं. तसेच उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना हातपाय जोडून त्यांना विनंती देखील केली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने नागपूरपासून दादरपर्यंत सर्व गेले त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदार संघाचा विकास करू शकलो नसतो. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना सोडून गेलो असा पुनरुच्चार पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगाव मधील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!