भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावरावेरसामाजिक

पुरामुळे शेतपिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करा – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तापी नदीला पूर आल्याने हतनूर बॅकवॉटर चे पाणी रावेर तालुक्यातील तापी काठच्या व परिसरातील गावा सह शेती पिकात घुसल्याने जिल्हा प्रशासनास बाधीत शेतपिकांची तात्काळ स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केल्या आहेत‌.

शनिवारी संततधार पाऊस आणि वादळामुळे रावेर तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले
मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे तापी नदीच्या जलपातळीत मोठी वाढ झाली. तापी नदीला आलेल्या पुरामुळे बकवातरचे पाणी उभ्या शेतां मध्ये घुसून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. तापी नदीच्या जलपातळीत झालेल्या वाढीमुळे हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने तसेच तापी नदीचे बॅकवॉटर नदीकाठच्या गावातील शेत पिके व घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या गावातील पूरग्रस्त बाधित ६७ कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम केले. ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी महसूल खात्याला नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर करून उपाययोजना राबविण्यात याव्यात. असा सूचना दिल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!