जळगाव जिल्ह्यात तापमानात सर्वाधिक घट,थंडीचा जोर वाढला
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तापमानात घट झाल्याने महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा घसरला आहे. ढगाळ वातावरण आणि पारा घसरल्याने अनेक भागात धुके सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.त्या मुळे जळगाव जिल्ह्यात हवामान विभागाच्या माहितीनुसार सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिलेल्या माहिती नुसार, जळगावमध्ये १२ तापमान असून, नाशिक आणि औरंगाबादमध्ये १३.२ तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र एकिकडे तापमानात घट होतेय, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवत आहे .जानेवारी महिना हा कडक थंडीचा महिना असून, राज्याच्या अनेक भागांत तापमान घट होताना दिसत आहे. तापमानात घट झाल्याने थंडी वाढत आहे मात्र, असं असलं तरी राज्याच्य काही भागांमध्ये अवक पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतातील पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.