जळगाव जिल्ह्यात आज ५ रुग्ण कोरोना बधित,जळगाव शहर व जामनेर वगळता सर्व तालुके निरंक
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील कोरोनाचे गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात फक्त पाच बाधीत रूग्ण आढळून आले असून ६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर व जामनेर तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नसल्याने जळगाव जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते.
आजच्या अहवालात जळगाव शहर-२, जामनेर-३ असे पाच रूग्ण आढळून आले आहे. उर्वरित १३ तालुके निरंक असल्याचे आजच्या अहवालात दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आजच्या अहवालात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ३६१ रूग्ण बाधित आढळले आहे. तर १ लाख ३९ हजार ३३५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात चाळीसगाव तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.