मुहूर्त ठरला! मा.खा. डॉ.उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांचा भाजप प्रवेश निच्चीत, “या” तारखेला करणार प्रवेश
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय भूकम्प होणार असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. तो दावा आता खरे होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ, केतकी पाटील ,पत्नी डॉ. वर्षा पाटील या भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणारं अशा चर्चा सुरु होत्या, मिळालेल्या माहितीनुसार, उद्या दिनांक २४ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई मध्ये प्रवेश करणार आहेत.
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जातं असतानात दुसरीकडे पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. नुकतेच डॉ उल्हास पाटील यांना कांग्रेस मधून निलंबित करण्यात आले आहे.ते भाजप मध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे, तसे संकेतही त्यांनी दिले आहेत.
कांग्रेस कडून रावेर लोकसभा मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी प्रमुख दावेदार असलेले मा खा. डॉ. उल्हास पाटील ,पत्नी डॉ.वर्षा पाटील,आपल्या कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह भाजपा पक्षात प्रवेश करतील अशा चर्चना उधाण आले होते, यावेळी काँग्रेस पक्षाकडून डॉ. केतकी पाटील या रावेर लोकसभा निवडणूक लढतील असं चित्र दिसत होतं. डॉ. केतकी पाटील यांनी रावेर लोकसभा मतदार संघात जनसंपर्क देखील सुरु केला आहे. भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच त्यांची भारतीय जनता पार्टीत प्रत्यक्ष प्रवेशाची तारीखच पक्की झाली असून उद्या बुधवारी २४ जानेवारी रोजी ते मुंबईत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. भाजपा प्रवेश होतं असल्याने त्यांना आगामी रावेर लोकसभा उमेदवारी देणे बाबत शब्दही दिला असल्याचीही चर्चा आहे. जर डॉ.केतकी पाटील यांना भाजपने प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी दिली तर विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता नाकारता येतं नाही.