भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगावातील तरुणाची गळफास लावून आत्महत्या !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा। शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सिंधी कॉलनी परिसरात रोहन इंदरलाल मेहता (वय-२४) यांचे एलएलबीचे शिक्षण झाले होते कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने तो मुंबई येथून जळगावी परतला होता. त्यानंतर भाऊ आणि तो बळीराम पेठेत साड्यांचा व्यवसाय करत होता. रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे उठला, वृत्तपत्र वाचन करून पुन्हा बसला. कुटुंबीय घराबाहेर गेलेले असताना त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहनची आई सुनीता ८ वाजून १० मिनिटांनी घरी परतल्यावर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. रोहनच्या पश्चात वडील, आई आणि एक १ मोठा भाऊ असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!