भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग कायम; रुग्ण संख्येत मोठी भर !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)।जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाचा झपाट्याने वाढत आहे. रविवारी देखील सलग काही दिवसांपासून नऊशेपार नविन बाधित रुग्ण आढळून येत आहे, जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९२३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ६५५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – २६४, जळगाव ग्रामीण-४५, भुसावळ- ४७, अमळनेर-४२, चोपडा-१९४, पाचोरा-१६, भडगाव-२६, धरणगाव-८६, यावल-३२, एरंडोल-६५, जामनेर-३२, रावेर-०८, पारोळा-३८, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-०३, बोदवड-२१, इतर जिल्ह्यातील-०४ असे एकुण ९२३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ७४ हजार ४९४ पर्यंत पोहचली असून ६४ हजार २१४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १४६७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ८८१३ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!