Jalgaon Night Curfew|जळगाव जिल्ह्यात १६ मार्च पासून रात्री संचारबंदी; हे असतील कडक निर्बंध…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे रुग्ण संख्या वाढत असल्याने त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्ग अधिक वाढ होऊ न देता उपाय योजना राबवणे आवश्यक आहे याकरता निर्बंध लागू करणे आवश्यक असून भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 897 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक 16 मार्च 2021 पासून रात्री 10 ते सकाळी 5 अशी संचारबंदी असेल पुढील आदेश होई पावतो जळगाव जिल्ह्यातील निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे आदेश आज दि.14 मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले
जिल्ह्यातील खालील प्रमाणे निर्बंध लागू करण्यात येत आहे–
1) सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्र खाजगी शिकवणी क्लासेस सर्वप्रकारचे कोचिंग क्लासेस दिनांक 16 /3 / 2019 पासून बंद राहतील. तथापि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थिती बंदी असली तरी संबंधातील शैक्षणिक आस्थापनां ऑनलाइन शिक्षणाची सुविधा देता येईल. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे कमी व तत्सम कामे करण्याकरिता संबंधित शाळा-महाविद्यालयात उपस्थित रहावे. इयत्ता दहावी व बारावी बाबतीत पालकांचे संमतीने विद्यार्थ्यांना उपस्थित राहतील.
2) राष्ट्रीय राज्य विद्यापीठ शासन शिक्षण मंडळ स्तरावरील यापूर्वीच घोषित झालेला परीक्षा covid-19 विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेण्यास परवानगी देण्यात येत आहे.अभ्यासिका लायब्ररी वाचनालयांना केवळ 50 टक्के क्षमतेच्या मर्यादित covid-19 नियमावलीचे पालन करून सुरू ठेवता येतील.जळगाव जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 कालावधीत चालू राहतील हे निर्बंध अत्यावश्यक सेवा मनुष्यप्राणी मात्र यासाठी जीवनावश्यक वस्तू भाजीपाला फळे किराणा दूध व वृत्तपत्र वितरण या बाबींना लागू राहणार नाही.
3) जळगाव जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.
4) अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल.लग्न समारंभ व इतर समारंभ दिनांक 20/ 3 /2021 पर्यंतचे पूर्व नियोजित असलेल्या कार्यक्रमांना बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलिस स्टेशन यांच्याकडून परवानगी घेण्यास व covid-19 चे बाबतीत सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे अधीन राहून तसेच आयोजक व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉलचे मालक यांनी याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलिस स्टेशन कडे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे अटीवर सकाळी 7 ते रात्री 7 वाजता यावेळेस घेण्यास परवानगी राहील.
5) लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल सार्वजनिक मोकळ्या ठिकाणी अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.लग्न समारंभ व इतर समारंभाचे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत नियमावलीचे पालन करून घरच्याघरी शास्त्रोक्त वैदिक पद्धतीने अथवा नोंदणीकृत विवाह पद्धतीने साजरा करण्यात यावेत. नोंदणीकृत विवाहासाठी जास्तीत जास्त 20 व्यक्ती उपस्थित राहण्याची परवानगी राहील.
6) सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय,धार्मिक, कार्यक्रम तसेच उत्सव, उरूस,समारंभ,यात्रा, दिंडी हाऊस व तत्सम धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहील.सर्व धार्मिक स्थळे एका वेळेस केवळ पाच लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजाअर्चा यासारख्या विधी करता खोलीत राहतील.सदर ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपासून सुरू राहिल. शनिवार व रविवार या दिवशी पूर्णपणे बंद राहतील सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा प्रदर्शने मेळावे संमेलने यांना बंदी राहील. जिम,व्यायाम शाळा,स्पोर्ट, कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टॅंक हे राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांना वैयक्तिक सरावासाठी सुरू राहतात स्पर्धा कार्यक्रम बंद राहील. सर्व प्रकारचे सिनेमागृहे,मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्यगृह, प्रेक्षागृह पूर्णपणे बंद राहतील खाद्यगृह परमिट रूम बार फक्त सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत covid-19 सर्वांचे पालन करून 50 टक्के टेबल क्षमतेने सुरू राहतील.
7) होम डिलिव्हरी चे किचन वितरण रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.कायद्याद्वारे बंधनकारक असणाऱ्या वैधानिक सभांना केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत मर्यादेच्या परवानगी राहील तथापि याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचित करणे आवश्यक आहे.मात्र जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा व जळगाव महानगरपालिका सर्वसाधारण सभा यांना सूट देण्यात आली आहे.उपस्थितीच्या संख्या मर्यादित राहील सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांचा वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर या बाबतीत पालन करून घेणे बंधनकारक राहील. तसेच covid-19 ची लक्षणे दिसून येणाऱ्या संशयित कर्मचाऱ्यांची covid-19 चाचणी करून घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील.
9) जळगाव जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सर्वांनी सदर ठिकाणी गर्दी नियंत्रित करणे सर्व व्यक्ती चेहऱ्यावर मास लावणे,सोशल गोष्टींचे पालन करणे याचा वापर करणे व हात धुण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांची राहील.सदर बाजार समितीच्या ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे शेतकरी व खरेदी करणारे व्यापारी यांनाच प्रवेश असेल सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे कोणत्याही रिटेलर्स किरकोळ व्यापारी यांना प्रवेश झाला असणार नाही तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव व सर्व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी संबंधित बाजार समिती या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन covid-19 नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचे खात्री करावी.भाजी मंडई 50% क्षमते ने सुरू राहील आणि एका आड एक प्रमाणे ओटे सुरू राहतील याची दक्षता स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी.
गर्दी जमवून करण्याची निदर्शने,मोर्चे यांना बंदी राहील. मात्र केवळ पाच लोकांची उपस्थिती स्थानिक पोलिस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागगास निवेदन देता येईल. संपूर्ण जळगाव जिल्हा दिनांक 16/ 3/20 21 पासून रात्री 10 वाजेपासून सकाळी 05 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात येत आहे.मात्र या संचारबंदी दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापनांना,आवश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, कंपनीत जाणारे येणारे कामगार संबंधित कामगारांना ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ऑटोरिक्षा यांना मुभा राहील मात्र ऑटो रिक्षा मधून चालक वगळता केवळ दोन व्यक्तींना प्रवास करता येईल.तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक व संबंधित आस्थापना उदाहरणार्थ पेट्रोल पंप सर्व संबंधित विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरू करून जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी व नागरिकांनी covid-19 चे मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बाबत जनजागृती करावी तसेच covid-19 बाबतीत शासनाने मार्गदर्शन शिक्षणाचे महत्त्व आपण सामाजिक अंतर राखणे हा सॅनिटायझर चा वापर इत्यादी बंधनकारक राहील. वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर भावी भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या तरतुदींचा शिक्षेस पात्र राहील सदरचा आदेशा आज दिनांक 14/ 3 / 2021 रोजी जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा