भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव दूध संघ अपहार : दोघा संशयितांना १९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी, आरोपींची संख्या सहा

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आणखी दोघं संशयितांना अटक केली असून आज दुपारी न्यायालयात हजर केलेल्या त्या दोघां संशयितांना १९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रवी मदनलाल अग्रवाल यांना अकोला तर चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम. पाटील ,जळगाव ,यांना जळगावातून पोलिसांनी अटक केली होती. याआधी चार संशयितांना अटक केली आहे.

जळगाव दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरिशंकर अग्रवाल यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर पाचवा संशयित आरोपी रवी मदनलाल अग्रवाल (रा. अकोला) याला देखील पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली होती. त्यानंतर आज सकाळी चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम. पाटील (जळगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दोघांची वैद्यकीय तपासणी करून दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याआधी अटकेतील चारही संशयितांना देखील १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्यामुळे आता १९ नोव्हेंबरला सर्वांना कोर्टात एकत्र हजर केले जाणार आहे. दरम्यान, यातील अग्रवाल हे दुध संघातील बी ग्रेडच्या तूपापासून लहान मुलांमध्ये प्रचंड आवडीचे असलेले राजमलाई हे चॉकलेट बनवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बी ग्रेडचे तूप मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे माहित असूनही त्याचा गोरखधंदा सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आल्याने कळते. या गुन्ह्यात आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!