जळगाव हादरले ; चाकूने भोसकून तरुणाचा खून
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज २१ आगस्ट रविवार रोजी संध्याकाळी साडे पाच वाजेचत सुमारास जाळगाव शहरातील शिवकॉलनी मध्ये एका दारूच्या अड्ड्यावर किरकोळ कारणावरून वाद होऊन अक्षय अजय चव्हाण या २३ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली.
येथील शिव कॉलनी चौकासमोरील दारूच्या अड्ड्यावर अक्षय अजय चव्हाण व बाळा पवार यांच्यात वाद झाला
त्या वादातून बाळा पवार याने अक्षय अजय चव्हाण , वय २३, मढी चौक,रा. पिंप्राळा याचा चाकूने भोसकत खून केल्याची घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनास्थळाची पोलीस निरीक्षक अरुण धनवडे , पीएसआय प्रदीप चांदेलकर यांनी पाहणी केली. जखमी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास मयत घोषित केले. घटनेची पोलीस माहिती घेत आहेत.