जळगाव नागरी सहकारी पतपेढी निवडणूक : १२ उमेदवारांचे अपील फेटाळले
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथील जळगाव नागरी सहकारी पतपेढी ची निवडणूक
२०२२ ते २७ होऊ घातलेली असून त्या निवडणुकी मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेद्वारांपैकी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विकास पॅनलचे १५ उमेदवारी अर्ज वैध ठरवले होते. व सहकार पॅनल चे १२ उमेदवारी अर्ज अवैध ठरवले होते.
सहकार पॅनलच्या उमेदवारी अर्ज आवैध ठरवलेल्या १२ उमेदवारांनी त्या विरोधात जिल्हा उपनिबंधक जळगाव यांचे कडे अपील दाखल केले होते त्या मध्ये विकास उखर्डू नारखेडे हे त्रयस्थ अर्जदार महणून दाखल झाले होते.विकास नारखेडे यांचे तर्फे ॲड सी बी लोहार यांनी काम पाहिले जिल्हा उपनिबंधक यांनी वादी १२ उमेदवारांचे अपील अमान्य केले आहे.