भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

नायब तहसीलदारासह कोतवाल जळगाव एसीबी च्या जाळ्यात

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। वाळू वाहतूक करणारे डंपरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यान पंचवीस हजाराची लाच घेणाऱ्या नायब तहसीलदारासह कोतवालाला जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करून अटक केली .वाळू वाहतूक करणाऱ्यां डंपरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ही लाच मागितली होती. नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट आणि कोतवाल राहूल नवल शिरोडे असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे भावाचे नावे दोन ढंपर वाहन असुन सदर ढंपर वाहनाने ते वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. दोन ढंपर वाहनांपैकी एक ढंपर वाहन हे एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा आहे. तसेच यापूर्वी देखील ढंपर अडवून जागेवरच सोडून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडून दि.०१/०३/२०२३ रोजी ३०,०००/- रुपये व दि.११/०३/२०२३ रोजी २३,०००/- रुपये असे नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट
यांनी जागेवरच घेतलेले आहेत.

त्यानंतर भट यांचे सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांनी कोतवाल राहूल नवल शिरोडे, यांची भेट घेतली असता तक्रारदार यांनी एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा असलेले ढंपर व दुसरे वाळू वाहतूक सुरू असलेले ढंपर असे तक्रारदार यांचे दोन्ही ढंपर वाहनांनी धरणगाव हद्दीमधुन वाळू वाहतूकीचा व्यवसाय कारवाई न करता चालु देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे कोतवाल यांनी प्रत्येकी ढंपरचे १५,०००/- रुपये प्रमाणे दोन्ही ढंपरचे प्रथम ३०,०००/-रुपये व तडजोडीअंती २५,०००/- रुपये लाचेची मागणी केली. तसेच याबाबत कोतवाल यांनी त्यांचे मोबाईल फोनवरून तक्रारदाराची नायब तहसीलदार भट यांचेशी बोलणी करवून दिली असता भट यांनी वर नमुद प्रमाणे लाचेची मागणी करून मागणी केलेली रक्कम कोतवाल राहुल नवल शिरोळे यांचेकडे देण्यास प्रोत्साहन दिले व त्याप्रमाणे मागणी केलेली २५,०००/-रुपये लाच रक्कम कोतवाल यांनी पंचासमक्ष पाळधी पोलीस दुरक्षेत्राच्या बाजुस असलेल्या रस्त्यावर स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे व नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट यांना तहसिल कार्यालय धरणगाव येथून ताब्यात घेण्यात आले. वरील दोन्ही आरोपीतांविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सदरची कारवाई शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. एस.के.बच्छाव, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.राकेश दुसाने. स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी. यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!