भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील स्थानिक शासकीय सुट्या जाहीर

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सन 2023 या कॅलेंडर वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 2 डिसेंबर, 2022 च्या अधिसुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन विभाग वगळून) तीन स्थानिक सुट्ट्या जाहिर केल्या आहेत.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी सोमवार दिनांक 6 मार्च, 2023 रोजी होळी निमित्ताने, बुधवार, दिनांक 30 ऑगस्ट, 2023 रोजी रक्षाबंधन व सोमवार, दिनांक 13 नोव्हेंबर, 2023 रोजी दिवाळीचा दुसरा दिवस याप्रमाणे एकूण तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. सर्व शासकीय आस्थापनांनी याची नोद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!