हत्या झालेल्या “त्या” घटनास्थळी मंगळसूत्र, दोन पैंजण सापडल्याने खळबळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्कl गेल्या दोन दिवसा पासून बेपत्ता असलेल्या जिनिंग कामगाराची हत्या झाली,त्या जिनिंगच्याच पाठीमागे असलेल्या शेतात शनिवार, २० एप्रिल रोजी दुपारी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय असून या प्रकरणात एका महिलेसह आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सुरेश पमरसिंग सोलंकी ,२६, रा. सेंधवा, मध्यप्रदेश, ह.मु. लक्ष्मी जिनिंगजवळ, कानळदा रोड. असे मयताचे नाव असून घटनास्थळावर पोलिसांना मृतदेह पालथा पडलेल्या अवस्थेत दिसून आला. मृतदेहाच्या काही अंतरावर मंगळसूत्र, दोन पैंजणव २० रुपयांचे नाणे आढळून आले.तसेच मयताच्या डोक्याच्या मागील बाजूला धारदार शस्त्राने वार केल्याचा घाव दिसून आला. त्यामुळे या तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. हा खून शुक्रवारी रात्रीच झाला असावा, अशीही शक्यता वर्तविली आहे.
कानळदा रस्त्यावरील आव्हाणे शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीची कापूस जिनिंग आहे. या ठिकाणी बाहेर गावावरून काही कामगार कामाला आहे. त्यातील सुरेश सोलंकी हा कामगार शुक्रवार, १९ एप्रिल पासून बेपत्ता होता. ठेकादार मनोज सोनवणे हे त्याचा शोध घेत होते. त्यावेळी जिनिंगच्या मागील बाजूला असलेल्या भरत खडके यांच्या मालकीच्या शेतात कडब्याची कुट्टी झाकून ठेवलेल्या प्लास्टिकवर सुरेशचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील व सहकारी घटनास्थळी पोहचले.