माहेरहून २५ लाख आणण्यासाठी विवाहीतेचा छळ; ९ जणांवर गुन्हा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। शहरातील वाटीकाश्रम परिसरात माहेर असलेल्या विवाहितेला पुण्यामध्ये नवीन प्लॅट घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रूपये आणण्यासाठी शारीरिक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळी पतीसह ९ जणांन विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील वाटीकाश्रम परिसरात माहेर असलेल्या हर्षाली निलेश सुर्यवंशी (वय-२७) रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील निलेश अशोक सुर्यवंशी यांच्याशी २०१५ मध्ये विवाह केला होता. पती निलेश सुर्यवंशी यांनी पुण्यात प्लॅट घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रूपये आणण्यासाठी दबाव टाकत होता पैश्यांची पुर्तता न झाल्याने पती निलेश याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणावे यासाठी सासरे अशोक तुकाराम सुर्यवंशी, सासू शोभार अशोक सुर्यवंशी, जेठ चंद्रकांत अशोक सुर्यवंशी, जेठाणी देवयानी चंद्रकांत सुर्यवंशी, मोठे सासरे बळीराम तुकाराम सुर्यवंशी, मोठे सासरे जीवराम तुकाराम सुर्यवंशी सर्व रा. भामलवाडी ता. रावेर, नणंद मनिषा राहूल पाटील, नंदोई राहूल अरूण पाटील रा. पार्वती नगर नाशिक यांनी यासर्व प्रकरणात पीडितेचे पती निलेश ला पाठबळ दिले. तसेच विवाहितेने पैसे न आणल्यास पतीने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने या सर्व प्रकारच्या सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहिता एप्रिल २०२० मध्ये माहेरी निघून आली याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला पतीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास पाटील करीत आहे.