विवाहितेची बांभोरीत गळफास घेऊन आत्महत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा: शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या एका २२ वर्षीय विवाहितेने रविवारी दुपारच्या सुमारास घरात कुणीही नसताना सासरी बांभोरी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकी आली आहे.
बांभोरी येथील सासर असलेल्या कविता राकेश सोनवणे (वय-२२) रा.दत्तनगर, वाल्मिक नगर, बांभोरी ता.धरणगाव व जळगावातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या कविता या शनिवारी मुलीला घेऊन माहेरी आल्या होत्या. मुलीला घरी ठेऊन त्या पुन्हा सासरी गेल्या. रविवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना त्यांनी छताला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कविता यांचा विवाह दोनवर्षांपुर्वी झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. दरम्यान, याप्रकरणी पाळधी पोलिसात नोंद करण्यात येत आहे.