जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मविआला स्पष्ट बहुमत, पालकमंत्र्यांना मोठा धक्का
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १८ पैकी १० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळाले असून कृउबाच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या लढाईत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत महायुतीच्या पॅनलची धुरा ही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे होती. तर महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व हे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे करत होते.
महाविकास आघाडीच्या पॅनलने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती ती शेवटपर्यंत कायम राहिली. यात १८ जागांपैकी १० जागा जिंकून महाविकास आघाडीचे विजय संपादन केला. शिंदे गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले तर एक ठिकाणी अपक्ष उमेदवाराने विजय मिळावीला . तर मविआच्या पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत मोठे यश संपादन केले आहे.