भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

फेसबुक वरून ओळख झाली, लग्नही झालं, डॉक्टर कडे नेल्यावर बिंग फुटलं आणि धक्काच बसला..

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। फेसबुकवर ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांशी चॅटिंग करायला सुरुवात केली. त्या नंतर तरुणीने थेट लग्नाचा तगादा च लावला त्यानंतर अवघ्या काही दिवसात दोघांनी विधिवत लग्न केले. परंतू एकेदिवशी नवरदेवाच्या मनात आपल्या पत्नीबाबत शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे कुटुंबियांनी नववधूला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांच्या रिपोर्टनंतर नववधूचे बिंग फुटलं आणि सर्वांना जबर धक्का बसला. कारण नववधू स्त्री नव्हे तर चक्क तृतीयपंथी होता. प्रकरण मिटवण्यासाठी तृतीयपंथी यांच्या सहकाऱ्यांनी चक्क दहा लाख रुपयांची मागणी केली,आणि तरुणांच्या कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली, या संदर्भात न्यायालयात दाद मागितल्यानंतर फसवणूक आणि खंडणी मागितल्या प्रकरणी खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने रामानंदनगर पोलिसांना दिले आहेत. दिव्या उर्फ रोहित मनीष मशीह (रा. भुसावळ), असे फसवणूक करणाऱ्या तृतीयपंथीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सुधाकर (वय २७, काल्पनिक नाव ) या तरुणास १४ एप्रिल २०२३ रोजी फेसबुकवर दिव्या उर्फ रोहित मनीष मशीह याची फ्रेंड रिक्वेस्ट आली. थोड्याच दिवसात दोघांनी एकमेकांशी केलेल्या चॅटिंगचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर लागलीच १५ दिवसांनी म्हणजेच २९ एप्रिल रोजी दोघांनी लग्न विधीवत लग्न केले.

लग्नानंतर काही दिवसांत आपली पत्नी ही नववधू सारखी वागत नव्हती. त्याला स्पर्श देखील करू देत नव्हती. त्यामुळे सुधाकरने ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनाही दिव्याला डॉक्टरांकडे नेत वैद्यकीय चाचणी केली. यात दिव्या ही स्त्री नसून तिला गर्भधारणा होऊ शकत नाही, असा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला. यामुळे कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांनी याबाबत दिव्याला विचारणा केल्यावर तिने सुधाकरच्या कुटुंबियांकडे तब्बल १० लाखांची मागणी केली.


अखेर सुधाकर याने न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले. त्यानुसार न्यायाधिश आर. वाय. खंडारे यांच्या न्यायालयात सुनावणीअंती न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. यात दिव्या ही महिला नसून दिव्या उर्फ रोहित मनिष मशीह याच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने रामानंदनगर पोलिसांना दिले आहेत. शुभमतर्फे अॅड. केदार भुसारी यांनी काम पाहिले. दरम्यान, दिव्या उर्फ रोहित याने चार जणांना अशाच प्रकारे लुबाडले असल्याचे अँड. भुसारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!