वैद्यमापन शास्त्र निरीक्षक विवेक झरेकर जळगाव एसीबी च्या जाळ्यात
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पेट्रोल पंपावरील नोझल मशिनचे स्टॅम्पिंग करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात ६,००० रुपयांची लाच स्वीकारणार्या जामनेर तालुक्यातील पहुर येथील तक्रारदाराच्या तक्रारीवरून पाचोरा येथील वैद्यमापन शास्त्र विभागाचा निरीक्षक विवेक सोनु झरेकर वय ५४ वर्ष, रा.पुनगाव रोड, पाचोरा, यांना मंगळवारी दुपारी जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली.
जामनेर तालुक्यातील पहूर येथील ४९ वर्षीय तक्रारदार यांचा जय बालाजी नावाचा पेट्रोल पंप आहे. या पंपावरील ४ झोनल मशीला स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी दिड हजारांप्रमाणे ६,०००/- रुपयांची लाच झरेकर यांनी मंगळवारी मागितली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. पहूर-जळगाव रोडवरील हॉटेल अजिंक्यमध्ये लाच स्वीकारताच संशयित आरोपीला अटक करण्यात आली. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमने यशस्वी केला.