तरुणीचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव तालुक्यातील एका गावात शौचास जात असलेल्या विवाहित तरुणीचा प्रवीण उर्फ रावसू दिलीप काळे ,याने विनयभंग केल्याची घटना घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात शौचास जात असतांना पिडीत विवाहित तरुणीला प्रवीण उर्फ रावसू दिलीप काळे याने मागून पकडले. व तू मला खूप आवडते, माझ्यासोबत शरीर संबंध ठेव, असे बोलून स्त्री मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले.तसेच एवढेच नाही तर, या बाबत तू कुणाला सांगितले तर तुला सोडणार नाही, असे बोलून पळून गेला.या बाबत तक्रार दिल्याने प्रवीण उर्फ रावसू काळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.