भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रमुक्ताईनगरव्हिडिओ

Video। BAMS कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कार्यामुक्त करणार नाही एकनाथ खडसेच्या फोन नंतर आरोग्य मंत्र्यांचे आश्वासन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। राज्यात माहे जुन 2019 पर्यंत बी.ए.एम.एस.आर्हताधारक डॉक्टर्स हे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अस्थायी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते. सदरील अस्थायी बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी यांचे समावेशनानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी यांचे पद रीक्त झाले, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्यास प्रशासनाला खुप अडचणी यायला सुरुवात झाली, त्यानंतर शासनाच्या म्हणन्यानुसार प्रयत्न करुनही रीक्त पदी एम.बी.बी.एस. आर्हताधारक उमेदवार मिळत नसल्याने अशा ठीकाणी (गट-अ पदावर)  बी.ए.एम.एस. आर्हताधारक वैद्यकीय अधिकारी यांची तदर्थ / कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गट-अ म्हणुन सन 2018-2019 मध्ये सदरील रिक्त पदे भरण्यात आली. त्यानंतर माहे मार्च-एप्रिल 2020 दरम्यान राज्यात सर्वत्र कोरोना साथ उद्रेकाला सुरुवात झाली, कालांतराने त्याचे कोरोना महामारीमध्ये रुपांतर होऊन संपुर्ण राज्यात हाहाकार माजला. सदरील कोरोना महामारीत आरोग्य यंत्रणेतील सर्वच डॉक्टरांसोबत बी.ए.एम.एस. आर्हताधारक तदर्थ/ कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील स्वत:च्या जिवाची परवा न करता प्रा आ केंद्राचे नियमीत कामकाज सांभाळुन कोवीड संशयीतांचे स्वॅब टेस्टीग, बाधीत कार्यक्षेत्रात सहवासीतांचे कोन्टॅक्ट ट्रेसींग वेळप्रसंगी कोवीड केअर सेंटर (सी.सी.सी./डी.सी.एच.सी.) व संपुर्ण कोवीड साथउद्रेकात अहोरात्र रुग्णसेवा केली आहे किंबहुना करत आहेत.

त्याचप्रमाणे माहे मे-जुन 2020 दरम्यान शासनाकडुन बंधपत्रित (बॉण्डेड) / कंत्राटी एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ केली गेली परंतु त्यात समान व सारख्याच जोखमीचे काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कुठलीही वेतनवाढ न देता नेहमी प्रमाणे उपेक्षीत ठेवण्यात आले. तरी देखील कोरोना साथ उद्रेकाच गांभीर्य व कर्तव्याची जाणीव ठेऊ शासनाच्या अडचणीच्या काळात बी.ए.एम.एस. तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुठलेही आंदोलन कीवा शासनाला वेठीस न धरता अहोरात्र सेवा दिली आहे, व देत आहेत. परंतु मागील 4 ते 5 दिवसापसुन कोवीड योदधा म्हणुन संबोधल्या जाणा-या बी.ए.एम.एस. तदर्थ् / कंत्राटी वैदकिय अधिका-यांच्या पदस्थापनेच्या / नियुक्तीच्या ठिकाणी एम.बी.बी.एस. बंधपत्रीत वैद्यकीय अधिका-यांना नियुक्ती देवुन बी.ए.एम.एस. तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त / सेवामुक्त करण्यात येत आहे यामुळे त्यांचेवर खुप मोठा अन्याय होत आहे , भविष्यात सदरील एम बी बी एस बंधत्रीत वै.अ.उच्च शिक्षणासाठी अथवा बंधपत्रीत कालावधी संपल्यानंतर सेवेतुन कार्यमुक्त झाल्यावर सबंध महाराष्ट्रातील प्रा आ केंद्राची  आरोग्य सेवा पुन्हा व्हेन्टीलेटरवर जाण्याची शक्यता आहे.

तसेच बी ए एम एस आर्हताधारक तदर्थ / कंत्राटी वै.अ. यांनी  कोरोना  महामारीत आरोग्य सेवेला दिलेले  योगदान  लक्षात घेता त्यांच्या नियुक्ती ‍ चे ठिकाणी  बंधपत्रीत एम बी बी एस वै.अ.यांना नियुक्ती देण्यात येवु नये अथवा नियुक्ती दिली  तरी त्या ठिकाणी  कार्यरत  बी ए एम एस  वै.अ. यांना  कार्यमुक्त करण्यात येवु नये अशी विनंती संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकूर, राज्य उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय साळुंखे, व इतर 15 जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या स्वाक्षरी असलेले निवेदन, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा adv रोहिणी खडसे खेवलकर  यांच्या नेतृत्वाखाली मा.मंत्री एकनाथराव खडसे यांना देण्यात आले. त्याअनुषंगाने मा एकनाथराव खडसे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेशजी टोपेशी फोनवर संवाद साधून करण्यात आली. यावेळी मागील 2 वर्षांपासून BAMS कंत्राटी / तदार्थ वैद्यकीय अधिकारी यांना ग्रामीण भागात उत्तम प्रकारे आरोग्य सेवा बजावलेली आहे, तसेच मागील 1 वर्षांपासून कोरून साथ उद्रेकामध्ये ज्यावेळी शासनाकडे आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर उप्लब्ध होत नव्हते अश्या कालखंडात BAMS गट अ वैद्यकीय अधिकारी यांनी किन्टॅक्ट ट्रेसिंग, सबब टेस्टिंग, सी सी सी / डी सी एच सी येथे रुग्णसेवा दिलेली आहे, आणि देत आहे व भविष्यात देखील देतील या योगदानाची जाणीव ठेवून आपण राज्यातील BAMS गट अ वैद्यकीय अधिकारी यांना कार्यामुक्त करू नये अशी मागणी एकनाथ खडसे यांनी राजेश टोपेंकडे केली. सदरील बाब आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मकतेने घेऊन राज्यातील एकही BAMS कंत्राटी / तदार्थ वैद्यकीय कार्यामुत होणार नाही असे आश्वासन दिले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!