मुक्ताईनगरात भाजपला जोरदार धक्का: ६ विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर/अक्षय काठोके: राज्यात शिवसेनेकडून भाजपला दे धक्का देण्याचे सत्र सुरूच असून संकटमोचक गिरीश महाजन यांना त्यांच्याच जिल्ह्यात शह देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला जोरदार धक्का दिलाय. मुक्ताईनगरमधील भाजपच्या ६ विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यानी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलंय. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय. यामुले राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या नगरसेवकांनी केला प्रवेश–
या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगर नगरपरिषदेतील नगरसेवक पियूष महाजन, मुकेश वानखेडे, संतोष कोळी, शबाना अब्दूल अरिफ, नुसरत मेहबूब खान, बिल्कीज अमानउल्ला खान या नगरसेवकांनी आज प्रवेश केल्याचे समजते. उद्या आणखी चार नगरसेवक दाखल होणार आहेत. नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगाव भाजपला हा दुसरा मोठा धक्का मानला जातोय. त्याच सोबत सदरील नगरसेवक खडसे गटाचे होते त्यामुळे खडसेंनाही मोठा धक्का असून एकेकाळी राज्यातील भाजपचे सर्वात मोठे नेते आणि विरोधी पक्षनेते राहिलेले एकनाथ खडसे गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये अडगळीत पडले होते. अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना सोबत घेत खडसे यांनी भाजपला जळगाव महानगरपालिकेत एक मोठा धक्का दिला होता, मात्र आता खुद्द खडसेंच्याच बालेकीला संमजलाजाणार मुक्ताईनगर नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे हे नक्की…