नगरपालिका निवडणूक ; प्रभाग रचना तयार करण्याचे राज्य शासनाचे आदेश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र नगरपरिषदा वनगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मध्ये संदर्भीय अधिनियमा नुसार सुधारीत केलेल्या तरतुदी प्रमाणे मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या नगरपरिषद,नगरपंचायत च्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागाची संख्या व रचना निश्चिंत करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करणेसाठी आवश्यक ती कारवाई तात्काळ सुरू करण्यात यावी तसेच सदरची कारवाई संदर्भीय अधिनियम व राज्य निवडणूक आयोगाच्या दि २७-१२-२०२१ व तद्नंतर वेळोवेळीच्या आदेशांन्वये सुधारित होणाऱ्या कार्यपद्धतीस अनुसरून करण्यात यावी असे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाकडून उपसचिव प्रियांका कुलकर्णी -छापवाले यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहेत.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यतील नगरपालिकांनी प्रभागरचनाना सुरुवात करून हरकती सुद्धा मागितल्या होत्या परंतु ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूक घ्यायच्या नाही असा विधानसभेत सर्वपक्षीय ठराव केल्याने तसेच त्या ठरावावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्याने निवडणूकसंदर्भाचे अधिकार राज्यशासनाला प्राप्त झालेने महाराष्ट्र नगरपरिषदा व नागरपंचायती अधिनियमानुसार असे आदेश काढण्यात आले आहेत.