भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

दिड लाखांची लाच घेतांना नगरपालिका कार्यालय अधीक्षक एसीबीच्या चक्रव्यूहात !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

एरंडोल (प्रतिनिधी): येथील म्हसावद नाका परिसरातील असलेल्या व्यापारी संकुल वरील जागेच्या पुढील नुतनीकरण करून देतो व सील केलेले गाळे लिलावमध्ये ताब्यात देतो व इतर गाळ्याना नगरपालिकेतर्फे नोटीस न देण्यासाठी 1 लाख 50 हजाराची लाच स्वीकारतांना नगरपालिका कार्यालय अधीक्षकास धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले असून लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे म्हसावद नाका व्यापारी संकुलच्या वरती गाळे आहेत या गाड्यांची मुदत संपली म्हणून नगरपालिकेने तक्रारदार यांच्या पत्नीला नोटीस देऊन गाळे सील करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती तेथे जिल्हाधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडून निकाल दिला होता. म्हणून नगरपालिकेने या निकालाच्या विरोधात मध्ये आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या ठिकाणी आयुक्त यांनी नगरपालिकेचा भरणा करून गाळे पुन्हा परत त्यांना देण्यात यावे असे सांगितले. तक्रारदार वारंवार नगरपालिकेत जाऊन आपण लावलेल्या गाड्यांना सील काढून घेण्यात यावे याकरिता विनंती करू लागला त्यावेळेस आरोपी यांनी सांगितले की तुम्हाला नोटीस फी सील केलेल्या गाड्यांची फी ही नगरपालिकेत भरावी लागेल किंवा आम्हाला याची फी द्यावी लागेल असे सांगितले तक्रारदार हे पहिल्यांदा एक लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी गेले होते परंतु एवढ्या पैशांमध्ये तुमचे काम होणार नाही असे आरोपींनी सांगितले व अपमानित करून त्यांना घरी जाण्यासाठी सांगितले. म्हणून तक्रारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ऑफिस मध्ये तक्रार केली.

पथकाचे प्रमुख सुनील कुराडे पोलीस उपाधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली एसीबीने सापळा रचल्यानंतर संजय दगडू ढमाळ वय 51 वर्षे राहणार 24 म्हाडा कॉलनी अमळनेर जिल्हा जळगाव यास शुक्रवारी दुपारी दिड लाखांची लाच पालिकेत स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली आहे, या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे , सुधीर सोनवणे , संतोष हिरे , कृष्णकांत वाडीले , प्रशांत चौधरी , राजन कदम , सुधीर मोरे यांच्या पथकाने यशस्वी केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!