जळगाव शहरात खुनाची मालिका सुरूच,चोवीस तासात दुसरा खून
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रात्री झालेल्या हल्ल्यात समता नगरातील तरुणांचा खून झाल्याच्या घटनेने जळगाव शहर हादरलेले असताना ही घटना शांतता होत नाही तोच शिवाजीनगरात पुन्हा दुसरा खून झाल्याची घटना घडली. जळगाव शहरात एकच दिवसात दोन खून झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली ,आधीच्या खुना प्रमाणेच आजच्या दुसऱ्या खुनातही अनैतिक संबंध कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आज दुपारी जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात सज्जनगड या इमारतीत नरेश आनंदा सोनवणे वय २९ वर्षे या युवकाची हत्या घडली. येथील रहिवासी असलेल्या महिलेचे दोन युवकांसोबत प्रेमसंबंध होते त्यातील एकाला सदर महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध असल्याचे समजले,व ह्या दुहेरी प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाल्याचा अंदाज आहे,सदर महिलेचा पती कामानिमित्त बाहेरगावी असून या घटनेतील मारेकरी फरार आहे,शहरात चोवीस तासात झालेल्या खुनाच्या दोन घटनांनी जळगाव शहर हादरले असून दोन्ही खून अनैतिक संबंधातून झाल्याचे प्रथम दर्शनी दिसते.